❤️पहिलं प्रेम❤️
एकदां रस्त्याने जाताना, एक मुलगी माझ्या कडे बघून हसली...
तीच्या एका हसण्यावर, माझ्या हृदयाने आपली सारे शस्त्रे होती टाकली..
ती नेमकी माझ्यावर हसली, की माझ्यासाठी, हेच कळत नव्हतं..
ती निघून गेली होती डोळ्या समोरून, पण तीच रूप काय सरत नव्हतं..
दुसऱ्या दिवशी पुन्हां तीची भेट झाली..
पुन्हा हृदयाची अवस्था बघवेनाशी झाली..
आता रोज नजरेचे इशारे होऊ लागले होते..
मित्र तीला प्रेमाने वहिनी म्हणू लागले होते..
हळुहळू नजरेच्या इशाऱ्यांच रूपांतर शब्दांत होऊ लागल..
तसतस तीच्या आणि माझ्यातल अंतर कमी होऊ लागल..
तीच्या आठवणीत ना पाण्याची तहान लागत, ना अन्नांच भान रहात होतं..
तीच्या एका फोनच्या घंटीने पोट ज्याम भरत होतं..
एक दिवस अचानक नजरे समोरून ती दिसेनाशी झाली...
अन दुसऱ्याच दिवशी लग्नं करुन जाताना ती गाडी मध्यें दिसली..
लग्नं झाल होतं तीच, तरी मी तीची वाट आतुरतेने पहात होतो..
पहिलं प्रेम ते माझं मी कसा विसरू शकतो...
ती ज्या ठिकाणी, मला पहिल्यांदा दिसली रस्त्यावर..
त्या ठिकाणी होतो मी तीच्या गस्तीवर..
आज ना उद्या ती मला दिसेल..
पुन्हां एकदा मला पाहुण गाला मध्यें हसेल...
पण माझ्या मना सारखं काही होत नव्हतं..
तीची वाट पहाण्यात दिवस एका मागे एक सरत होतं..
एक दिवस अचानक एक मोठी गाडी, माझ्या समोर येऊन उभी झाली..
लक्ष्मीच्या पावलांनी ती गाडी मधुन खाली आली..
तीला पुन्हां एकदा पाहुण अश्रूंचा महापुर आला..
तेवढ्यात तीच्या जवळ येऊन एक भोपळा उभा झाला..
अरे देवा! ह्या भोपळ्याला ही कैरी कशी हो म्हंटली..
तेवढय़ात त्या गाडीवर "सरकरी नोकरी" नावाची पाटी मी वाचली..
अन ठरवलं, आता बास झालं, आता खुप कष्ट करायचं, अन मोठ व्हांयचं..
हसलीच कोणती पोरगी आपल्याकडे बघुन, तर मान वाकडी करुन रस्त्याने चालत रहायचं... रस्त्याने चालत रहायचं..
- अजित पवार (Aj)
© All Rights Reserved