...

3 views

का हे आठवणींचे कुंपण?
ही आठवण, आठवण, आठवण म्हणजे काय हो?
प्रिय व्यक्तीची जीवनात असलेली उणीव....
का तो आपल्या जवळ नाही याची जाणीव.......

हवा हवासा वाटतो एखाद्या व्यक्तीचा सहवास...
त्याच्या दुराव्याने होऊ लागते मग मन उदास.....
त्याने जाणवून दिले असते, तू आहेस खुप खास...
मग तो थोडाही दूर गेला की होऊ लागतो त्रास....
हीच का त्याची आठवण...

कधी कधी कोणाच्या सोबतीत राहायला आवडतं....
त्याचं वागणं, बोलणं, राहणं मनाला खूप भावत....
त्याच्या सहवासात साऱ्या वेदना, दुःख विसरत....
मग कुठे आपल्या मनाला त्याच्या शिवाय राहवत....

एकदा खरे प्रामाणिक स्वतःला विचारून पहा....?
खरचं आपण कोणाच्या आठवणीत झुरतो का?
तो नाही किंवा त्याची कमी आहे म्हणून रडतो का?

खरे सांगायचे झाले तर....
त्याच्यासाठी नाही आपण आपल्यासाठी त्याला आठवतो...
त्याच्या सोबतच्या त्या क्षणात मग स्वतःला ही हरवतो...
त्याला आठवता आठवता आपण सारं काही विसरतो....
गेलेल्या त्या क्षणासाठी आत्ताचे सुखद क्षण गमावतो....

त्याने व्यापलेली असते आयुष्याची रिक्त पोकळी.....
त्याला मनातले सर्व सांगून होतात सारी दुःख मोकळी...

त्याच्या सोबत गुंतले असते आपले हृदय, मनाचे आंगण....
तुटणे शक्य नसते आपणच बांधलेले आठवणींचे कुंपण...
तो जवळ नसला की दुःखाने भारतात आनंदाचे क्षण...
ही आठवण साठवण न राहता मग बनून जाते दडपण.....
बनून जाते दडपण.....

© Rashmi Kaulwar