...

12 views

अबोला...
नको ना हा अबोला
​सल टोचतेय मनाला
​तुझ्या शब्दाशिवाय काही
​अर्थ नाही या जिवाला..

​आठवण ती तुझी
श्वासांशिवाय ​न संपणारी
​आठवता कळ ती उठे
​जीवघेणी अंतरी...

​वाट दाखवलीस मला
​या अनोळखी वळणाची
​अधांतरी सुटला हात
​असणार नाही मी स्वतःची...

​नसे मजला ज्ञान
​या कपटी जगाचे
​तू असता सोबत माझ्या
​अर्थ आहे जगण्याचे..

​ शोभा मानवटकर...


© All Rights Reserved