...

9 views

झुळझुळ वारा !
शांत करीत सुमन परिसराला
मंद होऊनी सुटलाय जरा
मनात झुळतोय खरा
झुळझुळ वारा !

दंग होत सारे झाड
सळसळ पाने होते बेभान
हिरवे अपर्ण ओढुन बसले
जसे पाहुन खुदकनं हसले !
मनात झुळतोय खरा
झुळझुळ वारा !

कुष्णवर्निय- काळ्या मातीत
गर्द पोपटी झाडाखाली
मायचे पाखरं घालीत
झोपावे आईच्या मांडीवरती !
मनात झुळतोय खरा
झुळझुळ वारा !

वसुंधरा जसे गायी गानी
आवकाश्याच्या पाणन्दीवरी
झोपत शांतपणे
घरट्यात बसलेली रंगीत पक्षी !
मनात झुळतोय खरा
झुळझुळ वारा !

सरिता गार होऊनी
हृदयाला करत पुकार
काळज मोठं कर आणि
खऱ्या आयुष्याला दे होकार !
मनात झुळतोय खरा
झुळझुळ वारा !

रंगात- रंगुनी श्याम चित्र पेरलयं
मोल आता कळाला की
'मन ' कोणाला म्हटलयं !
मनात झुळतोय खरा
झुळझुळ वारा !

___दुर्गेश लोखंडे
(Durgesh Lokhande)