...

20 views

प्रेम वेडा
@Pranil_Gamre
तू समोर येताच ह्रूदयाचे ठोके पळू लागतात
माझे डोळे तुलाच एकटक पाहत राहतात

तू तूझ्या केसांचे बट सावरताना मी पाहत राहणं
नेमकं माझ्याकडे तुझं लक्षं जाताच मी दुसरीकडे पाहणं

तू गोड लाजल्यामुळे मी वेडा पिसा होऊन जातो
काय सांगू तुला दिवसा रात्री मी तुझ्याच विचारात असतो

तुझी हाक ऐकण्यास मी सदैव आतूर अस्तो
तू नसताना भवती तेव्हा तूझा भास माझ्यासोबत अस्तो

तुझ्याशी गाठी भेटी होण्यासाठी मन अगदी व्याकूळ असतं
जणू त्याला ईतर कोणत्याच गोष्टींच काही पडलेलं नसतं

माहीत आहे मला मी तुझ्यासाठी प्रेम वेडा झालोय
नातं निर्माण होण्याआधीच तया नात्यात रमू लागलोय

तूझा प्रियकर मी , तूझा होकार मिळवूनच राहीन
ह्या जन्मी शक्य नसेल तर पुढचे सात जन्म तुझी वाट पाहीन

© Pranil_Gamre