...

5 views

प्रदूषण दायी रिफायनरी प्रकल्प

काय साहेब मी ऐकल
ते खरच खरय काय ?,
नविन प्रकल्प कोकणात
आणताय त्याची गरज आहे काय?,

रोजगार वाढावा म्हणून करताय
की कोकणाचे सौदंर्य मिटवताय,
गरीबाच्या पोटाला आधार देताय
की पाया खालच्या जमिनी घेताय,

रिफायनरी प्रकल्पाला कोकणातच
परवानगी काय म्हणून तुम्ही दिली,
आधीच प्रदूषण दायक प्रकल्प आहेत
त्यांनीच कोकणाची अवस्था काय केली,

नका साहेब एखाद्याच्या पोटासाठी
प्रदूषण तुम्ही आणू नका नव्याने,
गरिबीत ही दिवस काढलेत प्रत्येक
कोकणातील वसलेल्या त्या गावाने,

ओंझल रिकामी तर रिकामी करू
शेती भाती आणि जगू ओ आनंदाने खरे,
आपल्याच कोकणाच्या सौदंर्याला
प्रदूषण नाही ओ साहेब खरच बरे, नाही बरे,

हात जोडतो आम्ही नका करू ओ
आमच्या जीवाचा घात साहेब नका करू,
कोकणाचे सोंदर्य टिकवून ठेवण्यासाठी
ह्या प्रकल्पला विरोध करून शेवटी मरू...

*@एक कोकणी माणूस*
----------------------------------------------
*कवि/ लेखक :- स्वहित दिपक कळंबटे.*
*( स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य )*
----------------------------------------------
© marathi_brother_writers