विरह
आभाळ भरून येते
दाटून आलेल्या सरी
तप्त विरहाच्या दारी
आल्या पावली
परतून जातात!!
आताशा असेच होते
मुक्यानेच शब्दांवाचून
कविता ओलेचिंब होते
नजर स्वप्नांच्या हवाली होते
पुन्हा त्या दिवसाला आलिंगन देण्यास ....आताशा असेच होते
चंद्रिका आळवत राकेशाला
काळातील रात्र सरत जाते
हरवत काळोखाला
रातराणीही कोमेजून जाते
आताशा असेच होते
© Bkt...
दाटून आलेल्या सरी
तप्त विरहाच्या दारी
आल्या पावली
परतून जातात!!
आताशा असेच होते
मुक्यानेच शब्दांवाचून
कविता ओलेचिंब होते
नजर स्वप्नांच्या हवाली होते
पुन्हा त्या दिवसाला आलिंगन देण्यास ....आताशा असेच होते
चंद्रिका आळवत राकेशाला
काळातील रात्र सरत जाते
हरवत काळोखाला
रातराणीही कोमेजून जाते
आताशा असेच होते
© Bkt...