गमावण्याचे दुःख
तुला गमावण्याचे दुःख
म्हणजे जीवंत
अस्तित्वातील
जगण्याच्या
मरणयातना जणू...
क्षण तो प्रत्येक
युगासमान भासे..
त्या दुःखाचे बघता रौद्ररूप
माझ्यातला नरवीर
अगदी कूचकामी दिसे...
गलबलून येता हृदयात
हुंदका ही मनातला
फुटू पाहे बाहेर...
दिसू नये कोणास म्हणून...
दुःखाचा बोळा तोंडात
अगदी कोंबून
ठेवतो मी नजर...
आयुष्यातील युद्धात
ना हरलो मी कधी
आजतागायत जगाशी
तुला गमावण्याच्या
दुःखात लढतांना
मात्र सुकलेला
पाचोळा होऊन
हरलो मी स्वतःशी...
शोभा मानवटकर...
© All Rights Reserved
म्हणजे जीवंत
अस्तित्वातील
जगण्याच्या
मरणयातना जणू...
क्षण तो प्रत्येक
युगासमान भासे..
त्या दुःखाचे बघता रौद्ररूप
माझ्यातला नरवीर
अगदी कूचकामी दिसे...
गलबलून येता हृदयात
हुंदका ही मनातला
फुटू पाहे बाहेर...
दिसू नये कोणास म्हणून...
दुःखाचा बोळा तोंडात
अगदी कोंबून
ठेवतो मी नजर...
आयुष्यातील युद्धात
ना हरलो मी कधी
आजतागायत जगाशी
तुला गमावण्याच्या
दुःखात लढतांना
मात्र सुकलेला
पाचोळा होऊन
हरलो मी स्वतःशी...
शोभा मानवटकर...
© All Rights Reserved