भीमा तुझ्या जन्मामुळे👍👍👍
कविता: भीमा तुझ्या जन्मामुळे --------------------------------------
कोटी कोटी नमन करतो भीमाबाई तुम्हाला
तुमच्या पोटी महानायक जन्माला आला
रामजी चं बोट धरून तुम्ही उभे राहिले
सर्वांच्या हृदयात घर करून केले
धन्य ती रमाई धन्य तीची पुण्याई
भाकरीच्या दोन तुकड्यात सुखी राही
भीमा तुमच्या जन्मामुळे सगळं बदललं
गरिबाच्या डोळ्यातील पाणी पुसल गेल
गांधी सावरकर आले आणि निघून गेले
साहेब तुम्ही गरिबाच्या अंधारात दिवे लावले
काळाराम प्रवेश,पुणे करार असो
अस्पृश्यता निवारण, धर्मांतर असो
दलीतांना न्याय तुम्ही न्याय मिळवून दिला
शूद्र सारखा कलंक धुळीत उडून गेले
समता बंधुता स्वतंत्र उदयास आले
शिक्षणाचा सागर तुमचा इतका मोठा
आजही जगात तुमचाच मान मोठा
अंधारातून उजेडात स्त्रियांना तूम्ही आणलं
ताठ मानेन स्वतंत्र जगायला तुम्ही शिकवल
कामगार नेता तुमच्या सारखा झाला नाही
गरीब मजुरांना तुमचाचं आधार राही
स्वतंत्र भारताला गणराज्य तुम्ही बनवलं
निस्वार्थ राहून देशाचा मान उंचावला
संकट काळी धाऊन तुम्ही आलात
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झालात
लोकशाही मानवी हक्क तुम्ही मिळवून दिला
हे भारतरत्न त्रिवार वंदन करतो
तुमच्या अनमोल देशाच्या बलिदानाला
जय भीम जय भारत
लेखक:-सूरज तायडे
कोटी कोटी नमन करतो भीमाबाई तुम्हाला
तुमच्या पोटी महानायक जन्माला आला
रामजी चं बोट धरून तुम्ही उभे राहिले
सर्वांच्या हृदयात घर करून केले
धन्य ती रमाई धन्य तीची पुण्याई
भाकरीच्या दोन तुकड्यात सुखी राही
भीमा तुमच्या जन्मामुळे सगळं बदललं
गरिबाच्या डोळ्यातील पाणी पुसल गेल
गांधी सावरकर आले आणि निघून गेले
साहेब तुम्ही गरिबाच्या अंधारात दिवे लावले
काळाराम प्रवेश,पुणे करार असो
अस्पृश्यता निवारण, धर्मांतर असो
दलीतांना न्याय तुम्ही न्याय मिळवून दिला
शूद्र सारखा कलंक धुळीत उडून गेले
समता बंधुता स्वतंत्र उदयास आले
शिक्षणाचा सागर तुमचा इतका मोठा
आजही जगात तुमचाच मान मोठा
अंधारातून उजेडात स्त्रियांना तूम्ही आणलं
ताठ मानेन स्वतंत्र जगायला तुम्ही शिकवल
कामगार नेता तुमच्या सारखा झाला नाही
गरीब मजुरांना तुमचाचं आधार राही
स्वतंत्र भारताला गणराज्य तुम्ही बनवलं
निस्वार्थ राहून देशाचा मान उंचावला
संकट काळी धाऊन तुम्ही आलात
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झालात
लोकशाही मानवी हक्क तुम्ही मिळवून दिला
हे भारतरत्न त्रिवार वंदन करतो
तुमच्या अनमोल देशाच्या बलिदानाला
जय भीम जय भारत
लेखक:-सूरज तायडे