...

1 views

चांडाळ चौकडीच्या करामती वेबसिरीज




जसे कमळ उगवावे चिखलातून
तसे उगवले हे तारे
(बाळासाहेब, पाटील, रामभाऊ,शुभाषराव, सरपंच)
या चांडाळ चौकडीच्या करामतीतून
महाराष्ट्रभर पसरले सारे......!

चांडाळ चौकडीच्या करामती लागताच,
खरंच राव जाम रमत मन
या साऱ्या कलाकारांच्या अदा पाहताच
हरवुन जातात सारे जण.....!

कधी हसवणं तर कधी रडवणं
हा चांडाळ चौकडीच्या करामतीचा खेळ
चालूच असतं यात एकमेकांना हसवणं,फसवणं
लगेच सावरण्याची पण आहे एक त्यांची वेळ....!

रामभाऊ हायतं लई मोठं पुढारी
पाटलांचा करामतीपणा शिकवतो बरच काही
शुभाषरावांच्या हातात संयमाची दोरी
बाळासाहेबांना दारुशिवाय काही सूचत नाही....!

सरपंच आमचे लेट पण थेट
गणाचा मात्र लई वेगळाच तोरा
संजूनानाच्या मनात भारी कपट
सरपंचबाई चिडल्यावर म्हणते सगळे मरा....!

चांडाळ चौकडीच्या करामती पाहणं
साऱ्या रशिक मायबापाचा छंद
या लाडक्या कलाकारांना एकच सांगणं
आम्ही पाहणं करणार नाही कधी बंद....!

                              मनिषा मिसाळ ( लोखंडे)