काव्यही केले तुझ्यावर...
तुझ्यावर काव्यही केले मी
तुझ्याच ओंजळीतील
शब्दांनी माझ्या भावनात
प्रितगंधाच्या सुगंधाने माळले मी...
तुझ्यावर काव्यही केले मी
स्पंदनातील प्रत्येक श्वासात
ओवून शब्दांचा सुगंध माझ्या
मनातील कूपीत भरभरून साठवला मी...
तुझ्यावर काव्यही केले मी
कित्येक शब्दांना पारखून
योग्य शब्दांनी माझ्या कवितांचे
अर्घ्य तुझ्या चरणी वाहिले मी
तुझ्यावर काव्यही केले मी
माझ्या अस्तित्वातील खुणा
प्रत्येक अनुभूतीत तुझ्याच भासांनी
तुझ्यातच काव्य रूपात अर्पिले मी...
शोभा मानवटकर...
© All Rights Reserved
तुझ्याच ओंजळीतील
शब्दांनी माझ्या भावनात
प्रितगंधाच्या सुगंधाने माळले मी...
तुझ्यावर काव्यही केले मी
स्पंदनातील प्रत्येक श्वासात
ओवून शब्दांचा सुगंध माझ्या
मनातील कूपीत भरभरून साठवला मी...
तुझ्यावर काव्यही केले मी
कित्येक शब्दांना पारखून
योग्य शब्दांनी माझ्या कवितांचे
अर्घ्य तुझ्या चरणी वाहिले मी
तुझ्यावर काव्यही केले मी
माझ्या अस्तित्वातील खुणा
प्रत्येक अनुभूतीत तुझ्याच भासांनी
तुझ्यातच काव्य रूपात अर्पिले मी...
शोभा मानवटकर...
© All Rights Reserved