...

8 views

काही गोष्टी न माहिती झालेल्या बऱ्या........
काही गोष्टी नसते माहिती करायच्या,
ते माहिती होऊन जाते.
आठवनही नसते करायची,
पण ते येऊन जाते.

त्या गोष्टीच रडवतात, दुखवतात
शेवटी त्याच कळवतात.
न पचनाऱ्याही गोष्टी पचवाव्या लागतात.

खुप आठवणी असतात,
लपवावं त्याही लागतात.
हृदय असतो नाजुक,
सांभाळावं त्यालाही लागतं .

कुणाला सांगावं कळेना से होते,
पण आपली गोष्ट आपल्या पर्यतच पुरते.
हृदयाला ठेच पोहोचते ,
भावना डोळ्यातून व्यक्त होतात.

कशी ही मैत्री,
दोन दिवसाची साथ न लाभली..
या मैत्रीत दु :ख मलाच मिळाले,
कारण तू सोबत नाही राहाले.

गोष्ट होती काही दिवसांची,
साथ होती मैत्रीची.
नेहमी आठवण येईल तुझी,
तु आठवण करशील न माझी ?

दुःख होते रे खुप,
विचार येतो,
का असतात ह्या सर्व गोष्टी खऱ्या,
शेवटी काही गोष्टी न माहिती झालेल्याच असतात बऱ्या.


© hima