...

11 views

वारा गाणं गुणगुणतोय .......
गारवा अंगाला झोंबतोय ,
थंडीत कोणी फिरतय का .....!
पाऊस नूकताच थांबलाय ,
चिंब भिजत कोणी जातय़ का .....!
पक्षी सूरात गाताएत ,
मैफील त्यांची जमलीय़ का....!
झाडाखालची ऊन-सावली नाचतेय़,
एकटच कोणी हसतय़ का.....!
पाण्यात तरंग उठलेत ,
तळ्याकाठी कोणी बसलय का......!
पावसाच़ पाणी चिंब करतय ,
कमळाची फूल़ लाजतायत् का ...!.
कोपर्यातला पारिजातक मोहरलाय ,
चाफ्याला कोणी खूणावतय़ का....!
झोपाळ्याची कूई़-कूई़ वाढलीय ,
वाट कोणी बघतय् का....!
रंग लाल वेगळाच वाटतोय ,
गुलाबावर फूलपाखरू बसतय् का.....!
वारा गाणं गुणगुणतोय ,
प्रेमात कोणी पडलय् का.....!
Ady......