...

0 views

माझ्या मनातील काहूर
कसं सांगू तुम्हाला
माझ्या मनातील काहूर,
तुम्ही मला आवडायला लागलात
हे सांगायचं जातं राहून......

काय सांगू तुम्हाला
जेव्हा तुम्हा पाहिले पहिल्यांदा,
अन् कसं सांगु तुम्हाला
तुमच्या प्रेमात पडले पहिल्यांदा......

तुम्हा सांगावेसे वाटते
पण होत नाही धाडस,
खूप काही बोलावेसे वाटते
होत नाही साहस.......

माझ्या मनाची व्यथा
तुम्हा कशी कळणार,
मीच काही बोलले नाही
तर तुम्हा तरी काय उमगणार......

तुमच्या काही आठवणीने
मला केलंय अनाथ,
असे वाटते सगळं सोडून
जावून बसावे वनात.......

तुमचा तो करारीपणा
माझ्या हृदयात बसला,
अन् तुमचं ते रूप
माझ्या मनात ठसलं........

रात्रंन दिवस तुम्हीच
आहे माझ्या मनात,
असे वाटते आत्ताच येवून
I love you म्हणावे कानात........

मनिषा मिसाळ (लोखंडे)