*बाबा हा कोण असतो ???*
जो झोपेला असून ही अर्धवट झोपेतुन उठून मुलांची औषध आणायला जातो... तो बाबा असतो.
स्वतःची आवड बाजूला ठेवून मुलांची आवड हसत हसत मान्य करतो...तो बाबा असतो.
स्वतःचं दुःख सहज बाजूला ठेवून मुलांसाठी रात्रंदिवस मेहनत करतो.. तो बाबा असतो.
स्वतः जुन्या गोष्टी वापरतो पण मुलांनी मागितलेली प्रत्येक गोष्ट त्यांना पुरवणारा... तो बाबा असतो.
आपल्या माणसांचे अश्रू पुसणारा आणि स्वतःचे अश्रू लपवणारा आणि जेव्हा कोणी विचारलं काय झाल ? अभाळाएवढं संकट असलं तरी काही नाही बोलणारा...तो बाबा असतो
मुलांनी सांगितलेली प्रतेक चांगली-वाईट गोष्ट शांतपणे ऐकून घेणारा......