...

6 views

आम्हा लेखकांची जमातच वेगळी
आम्हा लेखकांची जमातच वेगळी.....

दुसऱ्याचे दु:ख आपले समजुन शब्दाश्रु ढळायला लागतात.

दुसऱ्यांचा विरह आपला समजुन विरहात जायला लागतं.

आम्हा लेखकांची जमातच वेगळी.

दुसऱ्यांना झालेल प्रेम आपलच समजुन गुलाबी आठवनी डोळ्यात तरंगायला लागतात.

आम्हा लेखकांची जमातच वेगळी.

दुसऱ्यांना अन्याय आपला समजुन लढायला लागतात.

दुसऱ्यांचा आनंद आपला समजुन आनंदी व्हायला लागतं.

आम्हा लेखकांची जमातच वेगळी
दुसऱ्यांचे कष्ट आपले समजुन व्यथा मांडायला लागतो.

काय सांगाव आमच्या भावना
तुमच्या दु:खाचे,सुखाचे,भावनेचे सोहळे कीतीतरी केले साजरे.
तरीपण आमची जमात बेदखलच का वाटते?

आमच असं काही नसतं सगळ तुमचच ओझ घेऊन जगतो.

तरी आम्ही दुर्लक्षीतच का आसतो.....?
तरी आम्ही दुर्लक्षीतच का आसतो.....?
© आठवनीचा कोंडमारा