...

6 views

मुलगी म्हंटलं की कानाला खडा..
जुन्या आठवणीनां आज जरा उजाळा देतो...
त्यावर साचलेली धुळ जरा साफ करून घेतो...
तुझा तो सहवास पुन्हा एकदा जरा जवळुन पहातो...
पण तुझ्या त्या गोड बोलण्या पासुन जरा लांबच रहातो..
तेव्हा फक्त तुझ्यासाठीच बोलतं होतो..
आता थोड स्वतःसाठी बोलुन पहातो..
तुझ्या सोबत तर सार आयुष्य जगायच होतं...
पण आता थोड स्वतःसाठी जगून पहातो...
मान्य मला तुला हवा तेवढा वेळ नाही देऊ शकलो...
कारण आयुष्याच्या वाटेवरचे चढउतार नव्हतो समजु शकलो...
तुझे सारे हट्ट अपेक्षा, वेळेत नाही पुर्ण करू शकलो..
कारण तेच हट्ट अपेक्षा पुर्ण करायला रात्र दिवस होतो राबलो...
पण तुला समोर फक्त मी दिसत होतो...
माझं तुझ्यावरच प्रेम तुला कधीच दिसलं नाही...
तु स्वतः पुरतीच विचार करत राहिलीस...
पण तुला आजुबाजूच जग कधीच दिसलं नाही..
येवढं सगळं करून शेवटी माझ्या वाट्याला काय तर...
" तुच झाला होता माझ्या मागे वेडा..."
या साऱ्या रामायणाने शिकवला मला खुप मोठा धडा...
तेव्हा पासुन ठरवलं " मुलगी म्हंटलं की कानाला खडा.."
- अजित पवार(Aj)


© All Rights Reserved