...

9 views

बालपण हे सुखाच्या चौकटीत होत
बालपण हे सुखाच्या चौकटीत होत..
मायेच्या प्रेमाचा डोक्यावर हाथ होत
घरात नांदणारा तो आईसाठी क्रष्ण बाळ होतं
केलेल्या प्रत्येक हट्टी चा तीथ समाधान होत
पळुन पाहील तर कळालं
बालपण हे सुखाच्या चौकटीत होत.

तुटलेली खेळणी होती पण जुळालेल नात होत
डोळ्यातुन अश्रु लाख पडले तरी पुसणार आईच हात होत
उंची छोटी असली तरी आजोबाच्या खांद्यावर सार आभाळ छोटं होत
वडील हाथ पकडुन चालताना माझ्यासाठी आधार होत
आठवतं सगळं "बालपण हे सुखाच्या चौकटीत होत".

केलेल्या चुका ,केलेली मस्ती तीथ सगळे गुन्हा माफ होत.
आईच्या मिठीत गेलं की सार जग छोटं होत
ना मागता सगळं मिळायच पण तिथं कसला सर्वार्थ नव्हत
लहानपणाची चौकट ओलांडून
जगाच्या अंगणात येऊन कळालं
बालपण हे सुखाच्या चौकटीत होत.

© ashpaktalikote