...

5 views

शेतकर्‍यांच्या नशीबी फुटके कौलं
अंधार दाटुन आलाय किमया काळ्या मेघांची...
आशांना मोहोर आलाय दुनिया वेड्या मनांची...
वर्षाविना आठवडा गेला फजिती पिवळ्या रानांची...
इंद्राला घ्यावी वाटली परीक्षा भोळ्या जनांची...

अचानक महापूर आला जळली कोवळी रोपं...
शेतकर्‍यांच्या माथी डोळी केवळ उघडी झोप...
हा महीनाभर चालला होता सृष्टीचा प्रकोप...
कोरडवाहू शेतकऱ्यांच्या आशा पावल्या लोप...

राबून दिवसभर तो गाळतोया घाम...
जागुन रातभर त्याचं चालतया काम...
मार्केटमध्ये बुद्धी तवा होतया जाम...
जवा मिठभाकरी पुरताच मिळतोया दाम...

सावकाराचे कर्ज मी आता कसे फेडू...
पुढचे पेरणे करायला दमडी कशी जोडू...
झाडाखाली एकटा फुंडसू-फुंडसू रडू...
की मन हलके करायला हंबरडा फोडू...

या उदासीन जीवनाचे आता काय करू...
परवडेल विष घ्यायला की फाशी लाऊन मरू...
संघर्षी जीवनाला का इतक्या लवकर हरू...
आयुष्याचे कौलं आपण पुन्हा एकदा फेरू...

© आशिष देशमुख