...

4 views

रम्य ती भटकंती

रम्य ती भटकंती
रम्य तिची निरागसता
घातले किती ही साकडे तरी
परतणार नाही पुन्हा ते घालवलेले क्षण आता

छान ती सह्याद्री
किती छान ते डोंगरराव
भटकंती करताना
सह्याद्रीच्या वाटेला भारी वाव

भटकंती करताना
सोबत घेतलेला जेवणाचा डब्बा ही आठवतो
आशीर्वादासाठी नजरेस पडलेला
गडकोटावरील दगडाचा देव ही आठवतो

आठवते ती भटकंतीची मजा
वाटेवरून चालताना आठवतो तो आपला भला शिवबा राजा
ज्याने स्वराज्याची स्थापना केली आणि
सुखी ठेवली आपली प्रजा

ह्या कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउनमुळे हरवली ती भटकंती
फक्त उरल्या त्या आठवणी
भटक्यांना सह्याद्रीचा हेवा
लॉकडाउन लवकर संपू दे आणि भटकंती सुरु होऊ देरे देवा...

© @Swa_hitkalambate 1044.