...

47 views

अक्षरांचे सोबती...
अक्षरांचे सोबती
बाराखडी असते !
जेव्हां बाराखडी
अक्षरांना सजवते...

अक्षरातील 'अ' अक्षराला
तेंव्हाच रूप येते !
जेव्हां बाराखडी
अक्षरांना सजवते...

कान्याचा आधार घेऊन
क चा का करते !
जेव्हां बाराखडी
अक्षरांना सजवते...

मात्र्यातील तिरकेपणा
शब्दांना आपलेपणा दाखवते !
जेव्हां बाराखडी
अक्षरांना सजवते...

वेलांटीचा पदर घेऊन
ट चा टी करते !
जेव्हां बाराखडी
अक्षरांना सजवते...

ऊकरांचा ऊ शब्दांपुढे
आदराने झुकते !
जेव्हां बाराखडी
अक्षरांना सजवते...

अनुस्वार प्रत्येक शब्दांना
अलंकारीत करते !
जेव्हां बाराखडी
अक्षरांना सजवते...

{pournima}🖊️