...

9 views

तुझ्यासाठी...
मला तू हवी आहेस
माझ्यासोबत जीवनभर
जिथे फक्त तू आणी मीच असेल
दुरावा नसेल आपल्यात कणभर

तुझ्या प्रत्येक शब्दाला
माझा पाठिंबा असेल
कितीही संकट आली
तरी मी तुझ्यासोबत उभा असेल

तुला माझ्यामध्ये
अशी काही जपून ठेवेन
जे काही आहे बाकी
ते आयुष्य फक्त तुझ्यासोबत जगेन
© AG