...

5 views

पाऊस सखा
पाऊस वाटे नखरेबाज सख्या जसा
धो धो कोसळे प्रेमात आंबुद जसा
कधी वाऱ्यासंगे ओढाळ दूर वाहतो तर
कधी अंगाअंगा झोंबणारा धारा जसा.
चाहूल कधी तर कधी आवाजी खासा
माळरानावर ओसंडत धावेल
कोसळणारा धबधबा जसा
काय सांगू तुझी वागण्याची तर्‍हा
रुसुन जाई उडून काळा कापूस जसा
वीज कडाडली तर घाबरे मन ससा
छोट्या डबक्यातून धावेल चपळ मासा
जसा दुर जाई वाट पहायला लावे
वाट पाहे नदी हवा हवासा तिज तुच तो प्रिय सखा...


© Bkt...