...

3 views

बाबा
youtube.com/channel/UC0aBrmV5Gb5tEfSPvxShg3A

मुळ स्वरूप हे देवाचे,
कधी आई तर कधी बाबांचे।
कौतुक करी जग नेहमी आईच्या मायेचे,
मात्र विसरू कसे प्रेम मी माझ्या बाबांचे ।।

संकटमोचक जरी असे श्री गणेश आणि हनुमान,
माझ्यासाठी मात्र माझे बाबाचं शक्तिमान।
जेव्हा वाढतं असे सावट भीतीचे,
धीर देती मात्र तेव्हा शब्द हे बाबांचे।।2।।

जरी अनेक विषयात होत नसे आमचे एकमत, तरी मात्र बोलण्यासाठी कोणत्यातरी विषयाचे निमित्त ।
शिस्त लावण्यासाठी नेहमी होत ते कठोर,
ज्यामुळं आम्हां आज मिळतो लोकांचा आदर ।। 3 ।।

मुलांसाठी जमेल तोपर्यंत करती हे कष्ट,
तरीही ना करिती कधी कुरकुर; ना होत कधी खाष्ट ।
मुलांच्या भविष्यासाठी हात यांच्या श्रमाचे,
नेहमीच कुटुंबासाठी बळी देत हे आपल्या सुखाच्या क्षणांचे ।।4।।

असे कसे हो बाबा तुम्ही कर्णापेक्षाही दानशूर?
कसा पडतो तुम्हा तुमच्या दुःखाचा विसर।
संसाराचा गाडा ओढण्यात तुम्ही सर्व आयुष्य रेटता,
जरी नाही झालं मनासारे तरी कसे हो तुम्ही हसता ।।5।।

बाबा बरेच केले कष्ट तुम्ही आता तरी थांबा,
आपल्या या घराचा मलासुद्धा होऊ दया मुख्य खांबा।
बाबा... तुमची सेवा करण्याची संधी दया आतातरी,
नाही तर कशी खाली करू मी तुमच्या ऋणाची तिजोरी।। 6 ।।