...

1 views

तिच्या आठवणी


आज खूप वर्षांनी तिचे
छायाचित्र पाहिले
हृदयातील भावना
अश्रू होऊन वाहिले

भूतकाळाच्या आठवणी
पुन्हा ताज्या झाल्या
काही होत्या उज्वल
तर काही होत्या काळ्या

माझ्या मनाची तरतूद
मी कोणासमोर मांडू
माझी नव्हती चूक
हे कोणाला मी सांगू

माफी मागुन सारखी तिची
थकलो होतो मी
तुच्छ लेखण्यासारख माझ्यात
काय होत कमी

भले झाला असेल त्रास
एका शब्दाने तर बोल
पडतात मनाला खाचे
जेव्हा असतेस तू अबोल

समजवण्यास तुला मी
अथांग केला प्रयास
कळून चुकले मला
तुला नकोय माझा सहवास

माझ्या प्रेमासमोर तुझा
अहंकार मोठा होता
तुझ्याशी प्रेम करणे
ह्यात माझाच तोटा होता

तू केलेला अपमान
ताजा आहे अजून
आठवे मला ते क्षण
तेव्हा होई मी नशेत धुंद

समाधानी होतो मी
जेव्हा होतीस माझ्या समोर
तू नसाल्यापासून राणी
जगणं झालंय कठोर

नाहीयेस माझा नशिबी
हे विधीचे विधान आहे
तुला मी स्वीकारावे
हा माझा गर्वाचा अपमान आहे

अनेक नाती आली
जवळीक त्यांनी साधली
पण तुझासरखी मोहकता
मी कोणातच नाही पाहिली

आज न उद्या अनंतात
विलीन व्हायचेच आहे
त्या आधी माझ्या प्रेमाचे
दर्शन घ्यायचेच आहे

हे हाडा मासाचे शरीर
कधी न कधी झिझेल
पण माझे प्रेम तुझ्यासाठी
ह्या जगात अमर असेल