...

3 views

मुलीची जीवन कथा
काय गं मुली काय जन्म घेऊन आलीस,
ज्या माय-बापाने वाढवले लाडात तुला त्यांनाच परकी झालीस।

वाटायचं आदी की आपल्याला पण अगदी वाडीलांसारखा नवरा हवा,
तसाच नवरा मिळाल्यावर सुद्धा का आदींच्या जीवनाचा हट्ट हवा।

माय-बापाने केला तुझा अस्तित्व उभा,
पण हा कुठला न्याय की आसारच्यांनीच सर्व श्रेय घ्यावा।

आहे मी खूप सुखात या माझ्या नवीन घरात,
तरी सुद्धा खूप आठवण येते तुमची प्रत्येक क्षणात।

वेळोवेळी आठवतात आठवणी त्या घराशी जडलेली,
नाही का येऊ शकत परत ती दिवस गेलेली।

आई-बाबा म्हणतात सासरच तुझं घर,
सासू-सासरे म्हणतात तू या घरात परकी पोर,
मुलीच्या जन्माला येऊन वाटत अस की कुठे लावून बसले मे माझ्या जीवनाला घोर।

कविता करताना सुद्धा डोळे पानावलेत रे देवा,
मुलींचं आयुष्य एवढं अवघड बनवताना तुझं मन तरी कसं मानलं बघा।


© All Rights Reserved