...

12 views

पहिले चुंबन
एका तासामध्येच
आपली ओळख झाली होती
बोलशील की नाही माझ्याशी
ह्याचीच होती भिती

त्या सुंदर स्त्रीचे आकर्षण
मनी मला भावले
नजर भेटीच्या खेळात
तिने प्रेम माझे जाणले

घरी कोणी नव्हते
मागचे दार होते बंद
शेजारी बसण्यासाठी
केला तिने आग्रह

शेजारी बसून तिच्या
वाटत होती भिती
काही तरी करावे
ह्याचीच धडधड होती

तिने एकटक पाहिले मला
मला कळला तिचा इशारा
जवळ जाऊन तिच्या
केला स्पर्शाचा वावरा

ओठात ओठ विरघळले
घट्ट मिठीत तिला आवळले
अंगी सुगंध महकले
वेळ काळ सारे थबकले

आठवणीत आहेत ते, एक एक क्षण
अल्पवयातील ते, पहिले आकर्षण
जवळ जाऊन तिच्या, जोडला संबंध
नाही विसरू शकत, माझे पाहिले चुंबन

(हे फक्त काल्पनिक काव्य आहे )


© All Rights Reserved