झालास नापास हरकत नाही
एक पायरी चुकली, काही अंकांनी हुकली
आयुष्याची वाट अजूनही कोणती पायरी थांबू नाही शकली
जागे हो रे, पुन्हा घडव तिला,
जी पायरी तुझी चुकली, काही अंकांनी हुकली
झालास नापास पडला थोडा अभ्यास ज्ञान कमी
आरे खचून जाऊ नकोस, मी करु शकतो पुन्हा अशी मनाला दे हमी
हो विचार जरी केला तसा तर मनाची तयारी लगेच होणार नाही
पण आयुष्यात पुढे जायचं असेल तर तुझ्याकडे ह्यावर पर्याय आहेका दुसरा काही...
नापास झालास म्हणून नक्कीच असेल भीती तुझ्या मनी
विचारही येत असतील तूला, समजुन घेईल का मला कोणी
थोडेसे नाराजही होतील तुझ्या ह्या नापास झालेल्या गोष्टीनी
पण तु समजून सांग मी पुन्हा तयारी करेन, मग ते नक्की घेतील आई बाबा समजुनी
अस ही वाटत असेल जग कोणत्या नजरेने पाहील तुझ्याकडे
टोमणे तर दुनिया साली मारणारच बघून आई बाबांकडे
तुझं लक्ष सारे वेधून घेतय जीव द्यावा ह्या विचाराकडे
एकदा जाणीव पूर्वक नजर दे आपल्या आयुष्याच्या त्या पुढील स्वप्नांकडे
असा हार मानू नकोस अजूनही हरला नाहीस वेड्या तु रे
एकदा खरच बघ तुझ्यासाठी घरच्यांनी काय काय केले रे
तु सुरुवात कर, नक्की होशील पास तुला पुन्हा संधी आहे रे
आरे असा घाबरून जाऊ नकोस वेड्या पून्हा रे ,
आयुष्यात छोट्या मोठ्या अडचणी येतच असतात रे ,
तु गाठशील तुझं ध्येय ती हिम्मत तेवढी तुझ्याकडे आहे रे..........
कवी :- पै. स्वहित दिपक कळंबटे
© @Swa_hitkalambate 1044.