हृदय प्रेमात पडलंय.....
मी(मन) vs हृदय...
हृदय माझ्या विरोधात जाऊन प्रेमात पडलंय..तर आमच्या दोघांण मधील हे भांडण मी ह्या कवितेत मांडलय..
***********************************
प्रेम तळ्याच्या तळाशी हे रुतून बसलय...
नकळत प्रेम तळ्यात हे बुडून बसलय...
खुप समजावले..पण माझ्यावरती रुसून बसलय...
ह्या प्रेमा पाई..भान सारं हारुन बसलय..
(हृदयाचे प्रयत्न......)
पेन अनं पेपर घेऊन दोन दिवस काही तरी अभ्यास करत ते बसलं...
दोन दिवसांच्या गहन अभ्यासा नंतर...
त्यांन प्रेम ह्या प्रश्नावर (?)..Hii..हे उत्तर शोधलं...
येवढं मोठं उत्तर पाहून हसू-हसू पोट माझं दुखलं...
हसू सावरत म्हटलं...भावा आता पुढे काय?
कुठे अडल?
(हृदया विरुध्द चाल.....)
शब्दांची चाल खेळून.. प्रेमाच्या बुध्दीबळात आघाडी घ्यावी म्हटलं तर...
शब्दसारे हृदयाची भाषा बोलुन माझ्याशी रुसून.. फुगून बसले..
नजर पण माझ्यापासून नजर चोरू लागली..
गुपचुप जाऊन हृदयाच्या टोळित ती बसु लागली..
कान पण.. ऐकुन न ऐकल्या सारखे करु लागले...
सारेच माझा पक्ष सोडून त्या हृदयाशी युती करु लागले...
(हृदयाची साथ.....)
हृदयाची साथ न देणं मलाच माझं आता खुपतय..
त्याच्या कडे बहुमत असुनही..ते माझ्या सोबतीची वाट बघतय..
हा प्रेम संग्राम जिंकायला माझ्याकडे सोबतीची हात मागतय...
मी तर हृदयाच्या सोबत उभा राहिल...
पण त्याला जिंकण्यासाठी "तु" पण जरा तुझ्या ह्रदयाशी बोलुन पहाशील..?
-अजित पवार(Aj)
© All Rights Reserved