...

9 views

विद्यार्थी 🙇🙇
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*एक विद्यार्थी आपल्या गुरुजींना शाळा सुरू करण्याची विनंती करतो आहे.*

बस झालाय आता
या कोरोनाचा चाळा
विनंती एकच गुरुजी
तुम्ही सुरू करा शाळा ।।ध्रु।।


ऑनलाईन शिक्षण
डोक्यात नाही शिरत
मोबाइलचा अभ्यास काही
मनात नाही भरत
कृतीयुक्त खेळ तुम्ही
आम्हा सोबत खेळा
विनंती एकच.........तुम्ही सुरु करा शाळा ।


मायबाप म्हणती हा
समय आला कैसा
पोट भरण्याइतका बी
जवळ नाही पैसा
रिचार्ज तुझ्यासाठी कोठून मारु बाळा
विनंती एकच..........तुम्ही सुरु करा शाळा ।


मोबाइल येऊ द्या किती
थ्रिजी किंवा फोरजी
साऱ्या गावाला आता
आठवतात गुरुजी
मार्ग यातून तुम्ही कसातरी काढा
विनंती एकच........तुम्ही सुरु करा शाळा ।

न्यावी...