...

5 views

सण की रोग, कसला हा भोग

दिवाळी नंतर आला शिमगा सण,
कोकणी माणसाचे उत्साही रे मन,
सारे देव ही आपले स्थान असे सोडुनी,
गाऱ्हाणी ऐकण्या येई पालखी रुपातुनी,

संचारते अंगी पालखी ही शिमग्याची,
कोरोनामुळे मन दुखावली भक्तांची,
परवानगी फक्त पंचवीस एक जणांची,
तिथे उपस्तीथी ग्रामस्थ व मानकऱ्यांची,

तीन तास सहाणेवर व होळीच्या दर्शनास,
वेळ पुरेसा नाही तुला गाऱ्हाणे सांगण्यास,
अडचणी कश्या सांगणार तुला साऱ्या रे,
धुमाकूळ घातलाय कोरोनाने तर खरा रे,

शहरातून यायचे खरे तुझ्या शिमगा सणाला,
कोरोनाच्या टेस्टला बळी पडावे लागते देहाला,
देवा पालखी जास्त वेळ नाही थांबणार,
नाचवायला कशी खांद्यावर तरी घेणार,

काय झाला आमचा गुन्हा रे,
सण ही साजरा करता येईना पुन्हा रे,
बघता बघता वर्षे सरले रे,
सृष्टीवर कोरोनाची महामारी उरली रे,......

भक्तांची येणारी पाऊले तुझ्या सणाला,
जागेवरच थांबली घाबरूनी कोरोनाला,
सृष्टीवरचे घालावं हे ताप सारे,
एवढीच विनवणी देवा तुझ्या पायी रे......

----------------------------------------------
कविराज:- स्वहित दिपक कळंबटे
(स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य )

जि.रत्नागिरी, ता.खेड - गुणदे गणवाल
----------------------------------------------
© @Swahit kalambate 1044.