...

19 views

शब्द
शब्द भुलवतात शब्द झुलवतात
शब्द फुलवतात
शब्द कातरवेळी सारखे असतात
शब्द हुरहूर मनाला लावून जातात

शब्द रूसतात, शब्द भांडतात
शब्द चिडतात
शब्द पाण्यासारखे असतात
ज्या भावनेत ढाळू
त्या भावनेत ढळतात

शब्द म्हणजे श्रिमंती
शब्द म्हणजे वैभव
शब्द सुर्यासारखे असतात
सगळीकडे फुकटात मिळतात.

शब्द माया देतात शब्द जीव लावतात
शब्द आईसारखे असतात
खूप खूप गहिवरलो की,
प्रेमाचे चार शब्दच मिठीत घेतात.

Puja🌼