...

5 views

... भास ...

शोधत तो एक खास,
पाखरासारखी भिरभिरते मी.
मी बावरते, मी सावरते.
का? का होतो मला तुझा भास?

थांबतेच येऊन तुझ्यापाशी,
आस! आस लागते भेटीची.
मी सावरते, मी आवरते.
का? होतोच का मला तुझा भास?

आकृती आठवणीतून आकाशात आकारते
पण अर्थहीन अनुप्रास.
शब्दही फुटेना, आणि भासही अर्थहीन.
अर्थहीन अनुप्रास, अर्थहीन भास.
का? का होतो मला तुझा भास?

मग बाकीच्यांशी ओळख,
एक नवीन पर्व.
मी आवरते, मी कावरते.
का? परत का होतो मला तुझा भास?

आता मी भुंग्यासारखी भिरभिरते,
प्रेमाच्या फुलावर ..
'तासाभरा' साठी.
एका फुलावरून दुसऱ्यावर.
का!
का?..
... भास.


#firstpoemhere #marathikavita #bhaas #psychological #delusion #hookup #Love #lonliness #sadness #stuck #moveon #defensemechanism #psychology #female #inlove #heartbroken #heartbreak #Darkness #cradleddarkness