...

14 views

काळजी (कोरोना)
बाळगा थोडी लाज ,घ्या काळजी आरोग्याची।     
विनंती नाही करत मी ,धमकी समजा हवी तर ती

सांगून नाही समजत ,असे किती तुम्ही निर्लज।
वेडे आहेत का ते पोलीस ,जे आहेत दिवसभर सज्ज

घरी बसून निगा राखा ,थकलं सांगून सरकार 
खूप मौन पाळलं ,आता होणार फक्त लाठीचार

जनता रक्षा साठी केली ,बस लोकल बंद
नियम तोडून सरकारचे ,चालत निघाले मंद 

कसले करताय विनोद ,काय मिळतंय ह्याने
माणस मरतयात आपली, विचित्र अश्या रोगाने

दिलेत वैद्यकीय उपाय ,वापरा ना घरी बसल्या
मास लावा हात धुवा ,वापरा तुमच्या अक्कला 

कायदा तोडून निघाले,असा काय करता हो व्यापार
 राजकारण नाहीये हे ,जे खेळेल तुमच्याशी सरकार

 गमावली आपली जनता, त्यांच्याकडे पुरेसा वेळ नव्हता
 जिंकू आपण हि लढाई ,आपल्याकडे आहे ती क्षमता

डॉक्टर, पोलीस ,सैन्य ह्यांचे मनापानापासून आभार
  कुटुंबापासून दूर राहून जे करतायत तुमचा विचार

                     

 ☘☘  कवी:-सुशांत जोशी (शुभांकर)☘☘