...

4 views

|| माझा देव गणराया ||
हे बाप्पा तु मोरया
तु जगाचा आहेस राया
वंदितो आज तुजला
बुद्धी दे रे तु मझला

शंकर पार्वतीचा तु पुत्र
भक्तांच्या मदतीचे तु सूत्र
हे विनायका बाप्पा मोरया
अदभूत शक्तीचा तु विघ्नराया

घेतोस तु हाक्केला धाव रे
पुजते तूला बाप्पा हे गाव रे
संकट काळी तुझे घेता नाम
होते आमचे मनापासून काम

आघात तुझी रे गणराया किर्ती
डोळ्यात बसले कायम तुझी मूर्ती
जगात तुझे किती नाम गाजते रे
तुझ्या आगमनासाठी ढोलताश्या वाजते रे

येता तुझे सण ह्या श्रुष्टीवरी
आनंद होतो साऱ्या भूमीवरी
स्पर्श करताच तुझे रे चरण
आलेले ही लांब जाते मरण

देवातला देव तु रे लंबोदरा
तुझ्या नामात तल्लीन देश सारा
नाम घेताच मुखी रे गणराया
मनी लाभते तुझी मोहमाया
© @Swahit kalambate 1044.