तुच साजणी...
पार्श्वभूमी: एक दिवस नवरा-बायको मध्ये कडाक्याचं भांडण होतं. आणि रागाने त्याची बायको माहेरा निघून जाते... काही दिवस तो तीच्या शिवाय रहातो पण काही काळातच त्याला तीची गरज भासु लागते. अन् तो तिला समजावण्यासाठी जातो.. त्यावेळी तो काय बोलतो ते ह्या कवितेत......
अरे कुण्या चेटकिनी ने केला लिंबु टाचण्यांचा वार...
माझा गुणी-गोमटा संसार..अर मोडला क्षणात...
राणी सोड रुसवा फुगवा..नको माझ्यावरी ताव....
अग रात दिस राणी तुझ जपतोया नाव...
तुझ्या विना काळीज, जशी काळीकुट्ट काळी रात...
आता एकलाच मी... अन् एकांताची साथ...
आतुरतेने पहातो या, तुझ्या पैंजणांची वाट..
तुझ्या दुराव्याचा आता मला सोसणाग भार..
आपल्या प्रेमाच्या गं पीका विना, सार ओसाढ गं रान...
गुर-ढोर सारी बसल्यात अनशनास...
हवा फक्त म्हणे मालकीनी च्या हातचा घास...
भांडी घेऊन धुळीच पांघरूण, बसल्यात गप्प चिडी चाप...
सांग किती दिवस घडवू त्यांना असा निर्जळी उपवास...
बागेच्या फुलांचा काही माझ्याशी वेगळाच वाद...
तिरक्या नजरेने पहातात, जसा माझ्यावर खुनाचा अपराध...
अग नको बघू अशी.. माह्या कड रागानं...
हात जोडतो गं राणी..चुकलं माझ वागणं...
तुला पहाण्या रोखतोया, अगं लवती पापणी...
देवा पुढ आता बस.. एक तुच मागणी...
साऱ्या विश्वामध्ये बस.. एक तुच देखणी...
अगं तुच माझी राणी...अगं तुच साजणी!!
-अजित पवार (Aj)
© All Rights Reserved