...

10 views

प्रेमाची होळी
ह्या होळीच्या रंगात मला ,तुझ्या सोबत खेळायचं
ओल्या झालेल्या शरीराला तुझ्या, स्पर्श करून बघायचंय

पाण्याने भरलेला फुगा तुझ्या ,हातावर मला मारायचंय
विस्कटलेला चेहरा बघून, तुझ्यावर खूप हसायचंय

थंड पाण्याची बादली तुझ्या ,डोक्यावर ओतायची आहे
तुला वाजणारी थंडी ,मला पण सोयासायची आहे

पिचकारितल्या रंगांना ,तुझी दिशा द्यायची आहे
तुला चिडलेल पाहून मला ,खूप मज्जा घ्याची आहे

ह्या होळीची रात्र ,तुझ्या आठवणीने भरायची आहे
सर्व गैरसमज जाळून, नवीन सुरुवात करायची आहे