...

2 views

इतुके ते सहजच!
किती ग सहजच!
किती ग सहजच!
किती ग सहजच!

हसणे ते किती ग सहजच!
बोलणे ते किती ग सहजच!

लाजून बघणे किती ग सहजच!
बघून लाजणे किती ग सहजच!

हसून बोलणे किती ग सहजच!
बोलून हसणे किती ग सहजच!

केसांशी ते खेळ खेळणे किती ग सहजच!
बटांच्या त्या लाटा करणे किती ग सहजच!

ते तुझे चोरुन पाहणे किती ग सहजच!
पाहता कुणी ती नजर चोरणे किती ग सहजच!

दातांखाली अंगुली चावणे किती ग सहजच!
अधरांनी त्या अधीर करणे किती ग सहजच!

ते तुझे ते पैंजण वाजवणे किती ग सहजच!
हस्त बिलवरा गीत सुचविणे किती ग सहजच!

सहजच साऱ्या लीला तुझ्या!
सहजच साऱ्या बाता तुझ्या!
सहजच येणे आठवा सवे! अन्
सहजच वारा सोबती तुझ्या!

सहजच गाली गुलाब खुलणे!
सहजच सुमनांसवे ते डूलणे!
सहजच येणे तव नाम ओठी!
सहजच आपुल्या पडाव्या गाठी!

इतुके ते सहजच!
इतुके ते सहजच!
इतुके ते सहजच!

– वि. र. तारकर.

© वि.र.तारकर.