...

42 views

काय बोलू महाराज
@Pranil_gamre
महाराज तुम्ही जाताना तुमची शिकवण ही तूमच्यासोबत गेली असं वाटतय
कारण आज महाराष्ट्रातलं लेकरू आपसात जाती जातीत भांडतय

सर्वांना एकत्र करून महाराज ज्या महाराष्ट्राला तुम्ही राखले
त्याच महाराष्ट्राने आज जाती धर्माच्या वादात घुसमटुण जणू जमिनीवर हात टेकले

या महाराष्ट्राला समानता बंधुता तुम्ही दिले खरे होते
आज दशा पाहून प्रश्न असा पडतो हे सारे खरंच का होते ?

तुमच्या काळात सर्वांच्या नजरेत महाराष्ट्राचं भलं आणि एकमेकांवर प्रेम दिसायचं
आज प्रमाणे कुणी कुणाचं जाती जातीतुण वैरी नसायचं

प्रत्येक स्त्री महाराष्ट्रात बिन दडपण मोकळेपणाने वावरायची
आज प्रमाणे कुणाची तिच्यावर वाईट नजरेने बघण्याची हिंमत नसायची

तुम्ही असताना हा राज्य समानतेचा राज्य असायचा
जाती धर्मावर टीका करण्याला राज्यात थारा नसायचा

माफी असावी पण लाज वाटेल तुम्हास , पाणावतील तुमचे डोळे
पाहुनी मराठी अस्मिता सोडून मराठी माणसास लागलेले जाती भेदाचे डोहाळे

पुन्हा जन्म झालाच जर तुमचा तर बघवणार नाही तुम्हाला हाल तुमच्या महाराष्ट्राचे
प्रश्न पडेल तुम्हास काय हाल करून ठेवले रयतेने स्वतःचे

लहानापासून ते मोठ्यांपर्यंत तुम्ही आहात सर्वांच्या ह्रूदयात
आशा हीच बाळगतो पूर्णपणे याल सर्वांच्या विचारत
©Pranil_gamre
#chattrapati #Raja

© Pranil_Gamre