...

1 views

रुसलाय रजनीगंध, हिरमुसलाय निशिगंध, आता तरी सोड तुझ्या मौनाचा बंध
रुसलाय रजनीगंध, हिरमुसलाय निशिगंध
आता तरी सोड तुझ्या मौनाचा बंध
बघ झुळूक हवेची, हलवी फुलं पान पाती
कर शब्द मोकळे, खुल्या पाखरच्या भाती
बघ निळ्या आसमंती, काळ्या बादलाची गर्दी
पावसाची रिमझिम शुरु, झाली ओली काळी माती
सांगतो तो तुला काळ्या मातीचा रे गंध
आता तरी सोड तुझ्या मौनाचा बंध

काय खुळं लावतोस ठायी वेड्या मना पायी
दुःख धरता कवेस नाही सुखं मिळत हाती
शोध जीवनी प्रकाश, जसा दिवा आणि वाती
सांगती सगळे तुला, कर त्यांचा अनुबंध
नको भावनांना स्वतःच्या घालु प्रतिबंध
रुसलाय रजनीगंध, हिरमुसलाय निशिगंध
आता तरी सोड तुझ्या मौनाचा बंध.

- किर्ती मेश्राम
© 🖋️दिलं-ए-जज्बात