...

4 views

केवळ तुझ्यामुळे...
केवळ तुझ्यामुळे..

भावनांनाही पंख फुटले
कोंडलेले श्वास आज मुक्त झाले
समाजाचा शेणाचा मारा सोसून
शिक्षणाचे बिजे रोवली
जरी आल्या काळोख्या वाटा
साथ मिळाली तुला ज्योतिबांची
आणि काढली पुण्यात पहिली शाळा
लाखो अडचणी मागे सारत
निघाली कृतीला
जर का, लेखणी आली नसती आमच्या हाती
घडली नसती मी
जर का शिकली नसती माझी माय
आज अक्षरांचं स्वातंत्र्य
कळला केवळ तुझ्यामुळेच...
केवळ तुझ्यामुळे.. !
-✍🏻जुईली सहारे
© All Rights Reserved