...

2 views

बाबांचे मनोगत..
आज कामावरुन येउन जरा दमलो होतो
लाडक्या लेकी ला खेळवत बसलो होतो..

तिला अंगाई गात आज जरा झोपवत होतो
तिला झोपाळ्यावर उंच झोके देत होतो..

तिच्या आठवणिन्ना जवळ साठवून ठेवत होतो
बाबा म्हणत जिने लळा लावला तिचे लाड पुरवत होतो..

तिच्या हाकेत अस्लेला गोडवा मनात दडवुन ठेवत होतो
काळ लोटला आणि ती कधी मोठी झाली हा विचार करत होतो..

कधी छोट्या हातांच्या भातुकली च्या पोळ्या खात होतो
आज तिचा मेंदी ने भरलेला हात सोपवून कन्यादान करत होतो.‌.

तिचे फोटो बघताना परत बाबा झाल्याची भावना जगून घेत होतो
माझ्या धनाच्या पेटी ला बाबा म्हणून आज आशिर्वाद देत होतो...!
© mor_pankhee🦚