कविता...
श्रृंगार त्या डोळ्याचा
करतांना भासतात
ते दूर कुठे तरी हरवलेले...
अगदी भावना नसलेले
जसे...भावरहित..
डोळ्यातील खालच्या
पापण्यांच्या ओठांवर...
काजळी लकेर उमटताच
वरच्या पापण्याही...
घेतात त्या काजळी
लकेरीची चव...पण...
डोळ्यात पांढरूकसे
पाणी ते आसवांचे...
साचते ते मात्र
निःशब्द त्या खालच्या...
पापण्यांच्या काजळी
लकेरीच्या किनाऱ्यावर...
शोभा मानवटकर...
© All Rights Reserved
करतांना भासतात
ते दूर कुठे तरी हरवलेले...
अगदी भावना नसलेले
जसे...भावरहित..
डोळ्यातील खालच्या
पापण्यांच्या ओठांवर...
काजळी लकेर उमटताच
वरच्या पापण्याही...
घेतात त्या काजळी
लकेरीची चव...पण...
डोळ्यात पांढरूकसे
पाणी ते आसवांचे...
साचते ते मात्र
निःशब्द त्या खालच्या...
पापण्यांच्या काजळी
लकेरीच्या किनाऱ्यावर...
शोभा मानवटकर...
© All Rights Reserved