...

15 views

कविता...💐💐
क्षणभंगूर आयुष्यासोबत
​स्वप्नांचेही वाढते वय
​इतके रूतून बसतात अंतरी
​अपूर्णतेची खंत ती बोचरी तुतारी...
​थोडं जरी स्वप्नांनी मला
​घेतलं असतं समजून
​अर्थ त्यांच्या येण्याचा
​मनालाही गेला असता सुखावून...
पण..​स्वप्नं ही ते वेडे
​येता माझ्याजवळ
​ज्या वाटेने आले...पुसूनी
​त्या वाटा गेल्या कोणाजवळ......