...

9 views

क्षितीज
धरती अंबर, प्रेम अलौकीक
क्षितीज होई साक्षी
तुजला तेथे ,शोधित फिरते
वेडे मन हे ,होऊनी पक्षी....
असतो तेथे सूर्य गुलाबी
लाल फुल प्रीतीचे
नभ पाठवितो ,जणू धरेला
प्रतीक हे प्रेमाचे....
चंद्र चांदण्या, तिथे बरसती
होऊन पारीजात
अशा ठिकाणी, जाऊन मी ही
झेलावी बरसात.....
क्षितीज नाही फक्त आभास
नसे काल्पनिक रेष
मिलन विरह ,सुख दु :खाची
तिथे ओलांडते वेस.....
असेच आपले ,प्रेम वसू दे
जीवन क्षितीजावरी
दूर दूर असूनी देखील
अगदी जवळ ...अंतरी .... !

© All Rights Reserved
© शिव पंडित

#love
#longdistancerelationship
#marathikavita