...

3 views

बेरंग
रंगात रंगून साऱ्यांच्या
बेरंग राहिले मी....
शोधते आहे नव्याने माझी मलाच मी
सतत ती बोलणारी हरवली या जगी
आता शांततेत च स्वतः ला रोज पाहते आहे मी
रंगात रंगून साऱ्यांच्या बेरंग राहिले मी....
हट्ट,राग, वेंधळेपणा, आणि तो नटखट बालपण या समजूत दारीच्या जगात हरवून बसले मी
रंगात रंगून साऱ्यांच्या बेरंग राहिले मी....
कोणाची बायको झाले, झाले कोणाची सून
या सगळ्यांच्या जबाबदारीत माझी मलाच शोधते आहे मी
रंगात रंगून साऱ्यांच्या बेरंग राहिले मी.... बेरंग राहिले मी......