...

27 views

कश्याला हवं प्रेम
@Pranil_Gamre
असच ठीक आहेे आपलं हे नातं
कश्याला हवय त्यात प्रेमाचं खातं

जिथे होतोय मोकळेपणाने संवाद
कश्याला हवाय तिथे प्रेमापोटी वाद

बरं आहे की जगासमोर रोजच भेटणं
नकोच ते जगापसूण लपून भेटत राहणं

मैत्रीत सोप्प असतं मन वळवणे
प्रेमात शक्य होईल का चुका विसरणे

खरं सांगतो आपण मैत्रीतच राहू
नको ह्या मैत्रीला प्रेमाचं नाव देऊ पाहू
©Pranil_Gamre
© Pranil_Gamre