...

6 views

◾एकदातरी तू येशील का?◾
अंधार्या रात्री 🌌चांदणी होऊन जगायला,
एकदातरी तू येशील का?
वेगवान वारापेक्षाही 🌀उंच उडायला,
माझी साथ 🤝तू देशील का?

वेदनांची गाणी 🎶व्हायला,
माझे शब्द✍ तू होशील का?
परिस्थितीच्या काचेवर चालायला,
पाय तू माझे होशिल का?

प्रत्येक क्षण हसत 😊घालवायचं,
ती आठवण तू माझी होशील का?
जरी कमीपणा असेल माझ्या जगण्यात,
तरी तू माझंं आयुष्य होशील का?

जरी ती माझी 😔शेवटची झोप असेल,
तरी तू माझ्या स्वप्नात 👀येशील का?
त्या स्वप्नांची कारणे 📄होऊन जगायला,
खरं सांग? एकदातरी तू येशील का?