...

7 views

प्रेमा तुझा रंग कसा

मनातल्या इच्छित प्रश्नांना तुझ्या,कस उत्तर देवू
ओठांवरच्या प्रिय हास्याला, कस हिरावून घेवू

तू सांगतेस तुझ्या आठवणी ,ज्या घडल्यात तुझ्यासोबत
मी नेहमी दुर्लक्ष करतो,जेव्हा विचारतेस माझ्याबाबत

माझा वास्तव्य आहे स्वच्छ, मला त्यातच रमता येत
भूतकाळ होता गलिच्छ ,नाही करू शकत व्यक्त


जे जवळ असताना स्वतःहून, जुळवून घेतात नाती
थोडा विसर पडला डोक्यात की नातीची करतात माती

डोळे फूटे पर्यंत रडलो,जेव्हा हे मला कळलं
दुसर नात निर्माण करण्यासाठी, कस काय मन वळलं

इतकीच होती हौस,मला सांगून तरी करायचे
बदलले असते मार्ग ,ह्या गमतीत जगण्याचे

परिस्थिती तर भली होती जेव्हा नाती तू तोडलीस
अपंग तर तेव्हा झालो जेव्हा तू ते शब्द बोललीस

नसत ऐकलं कोणाचं, बघितली नसती वाट
तू सांगितलं असतंस,आहेर दिला असता लग्नात

मोडलीस माझी स्वप्न ,करून हृदयावर आघात
तरीही इच्छा मांगतो देवाकडे ,ठेव तिला सुखात