...

9 views

एक कविता तुमच्यासाठी

तूला बायको म्हणूकी प्रियसी,
आयुष्यात तुझी साथ कायम वाटे हवी हवीशी......
तुम्ही आयुष्यात माझ्या आता आलात ,
मी आनंदी असेन तुमच्या सोबत पुढील जगताना जीवनात......

मला हवी आयुष्यात कायम तुमच्या प्रेमाची हमी,
शब्द ही माझे कौतुकरूपी पडतील तुमच्यासाठी कमी....
असतेस सोबत माझ्या जेव्हा,
नेहमी हास्य असत चेहऱ्यावर माझ्या तेव्हा.....

माझ्यासाठी वेळात वेळ काढुनी महत्वाच्या त्या कामातुनी,
तुम्ही जागा करून घेतले माझ्या त्या वेड्या मनी....
जेव्हा बघतेस डोळ्याच्या त्या नजरेने,
खूप भारी वाट डोळ्याच्या नजरा माझ्या डोळ्यांना भिडल्याने......

जेव्हा तु माझ्याशी बोलायचीस तेव्हा मी पूर्णपणे हरवून जायचो,
तुझ्या बोलण्या कडे लक्ष न देता तुलाच एकटक पहायचो.......
मन न्हवते भरत जेव्हा आपण एकांततात सुध्दा भेटून,
तरी पुन्हा तुझ्या घरा बाहेर तूला पहायला यायचो थोडस दुरून तेही अगदी चोरून.......

कविता लिहिण्यापूर्वी मनात विचारांचा कहर झाला,
तुझ्यावर केलेल्या प्रेमाचे माझ्या मुखातल्या शब्दरुपात तुझ्यासाठी आज बहर आला........
तुझ्या येणाने माझे आयुष्यच बदले सारे,
खरच तूला कायम बायकोच बोलू कारे......


© @Swa_hitkalambate 1044.